भाषा स्वतंत्र असते. भाषेला एकच व्याकरण असते. पण मराठीचे 'तत्सम (संस्कृत मधून मराठीत आलेले शब्द) आणि 'तत्भव' (मराठीचे देशी शब्द) असे दोन तुकडे केले गेले. कारण 'तत्सम' शब्दांसाठी पाणिनींच्या व्याकरणाची पुष्टी देता आली. त्यामुळे असंख्य अनुत्तरीत प्रश्न मराठीत निर्माण झाले. मराठीची ज्ञानेश्वरांनी संस्कृतपासून मुक्तता केली पण आज पुन्हा मराठी लाचारीने, कण्हतकुठत, प्रचंड दडपणाखाली, व्याकरणीय दहशतीखाली वावरते आहे. चला आपण मराठीला स्वतंत्र करू.
Sunday, September 12, 2010
प्रश्न - 'शोध मराठीचा' संशोधनाने मांडलेल्या व्यंजन-स्वरांच्या उपजत मूलभूत व्याख्येने काय साधले जाणार आहे?
उत्तर - इंग्रजांच्या काळापासून महाराष्ट्रात पुस्तकी व्याकरण शिकवायला सुरवात झाली. आजचे पुस्तकी व्याकरण म्हणजे ''संस्कृतच्या व्याकरणाला साजेलसे मराठी'' ठरते. त्यामुळे मराठीचे मराठीतच 'तत्सम (संस्कृत मधून मराठीत आलेले शब्द) आणि 'तत्भव' (मराठीचे देशी शब्द) असे विभजन करावे लागले.
भाषा स्वतंत्र असते. भाषेला एकच व्याकरण असते. भाषेचे दोन तुकडे करून त्यातल्या एका भागाला संस्कृतचे व्याकरण आणि दुसर्या भागाला नगण्य समजले गेले. कारण 'तत्सम' शब्दांसाठी पाणिनींच्या व्याकरणाची पुष्टी देता आली. त्यामुळे असंख्य अनुत्तरीत प्रश्न मराठीत निर्माण झाले. मराठी म्हणजे संस्कृतची मांडलीक असे समजले गेले.
संस्कृतच्या पराधीनतेने व्यापलेली मराठी आज लाचारीने, कण्हतकुठत, प्रचंड दडपणाखाली, व्याकरणीय दहशतीखाली वावरते आहे. संस्कृतची गुलाम असे व्यक्त करण्यात येणार्या भाषेबाबत मराठीच्याच पुढच्या पिढ्यांना मराठी बद्दल जाज्वल्य अभिमान कसा वाटावा? ज्या मराठीची ज्ञानेश्वरांनी संस्कृतपासून मुक्तता केली त्याच मराठीला व्याकरणकारांनी पुन्हा एकदा संस्कृतच्या जोखडाला जोडण्यात यश प्राप्त केले आहे.
मराठीची घराघरातून पिछेहाट होण्याचे महत्त्वाचे कारण मराठीला व्याकरणाने स्वाभिमान दिला नाही. 'ऋ, लृ' आहेत का?, 'ब्राह्मण' की 'ब्राम्हण'? मराठीतला 'च कोणता, 'चमचा, चव' मधला की 'चतूर, चन्द्र' मधला? असे अगणीत अनुत्तरीत प्रश्न 'शोध मराठीचा' संशोधनाने मांडलेल्या व्यंजन-स्वरांच्या उपजत मूलभूत व्याख्येतून कायमचे अचुकपणे सुटतात.
मराठी लोकाभिमुख व स्वाभिमानी बनवणे, 'शुद्ध-अशुद्ध'पणाच्या व्याधीतून कायमची सुटका करणे, समाजाला मुक्तपणे लेखन करता येणे, व्याकरणाची दहशत न भासणे, अशा असंख्य गोष्टी लवकरच साध्य होऊ शकतात. मराठीच्या विकासातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वांची मदत आवश्यक आहे. व्यंजन-स्वरांच्या नव्या व्याख्या पडताळून त्यात काही चुक नाही ना? याची खात्री करा. संपर्क साधा. 9833102727
आपला,
शुभानन गांगल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment